आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे स्थानकावर सध्या अस्तित्वात असलेल्या शहरातील पहिल्या व सर्वात जुन्या पुलाची मुदत संपली आहे. १९७०-७१ मध्ये या पुलाचे काम पूर्ण झाले होते. तेव्हापासून याला ५२ वर्षे पूर्ण झाली असून, त्यामुळेच हा रॅम्प तंत्रज्ञानाने तयार केलेला पूल पाडून त्याजागी ९० काेटी रुपये खर्च करून नव्या व्हायडक्ट तंत्रज्ञानाने पिलरवर उभ्या उड्डाण पुलाचे निर्माण केले जाणार आहे. हा नवा पूल तयार होण्यास किमान एक वर्ष लागेल. तत्पूर्वी जुना पूल पाडावा लागेल. यासाठी रेल्वेसोबतच पत्रव्यवहार लवकरच केला जाणार आहे. कारण हा पूल रेल्वेस्टेशन व रुळावरून गेला आहे. त्यानंतर सध्या अस्तित्वात असलेला पूल पाडण्याची कारवाई सुरू केली जाईल. या पुलावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वाहतूकही इतरत्र वळवली जाईल. हा पूल शहराच्या विविध भागांना अमरावतीच्या मध्य भागाशी जोडतो.
‘सार्वजनिक बांधकाम’कडे प्रस्ताव पाठवला रेल्वे स्थानकावरील पुलाची मुदत संपल्यामुळे या ठिकाणी नवा उड्डाणपूल तयार करण्याच्या उद्देशाने अंदाजपत्रक तयार करावे असा प्रस्ताव पीडब्ल्यूडीकडे पाठवला आहे. त्यांनी काम सुरू केले आहे. - जीवन सदार, तांत्रिक सल्लागार, मनपा.
पुलाचे सर्वेक्षण पूर्ण झाले रेल्वे स्थानकावरील पुलाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जे अंदाजपत्रक तयार झाले, त्यानुसार नव्या पुलासाठी ९० कोटी रुपये खर्च येणार असून, नवा पूल व्हायडक्ट तंत्रज्ञानाद्वारे पिलर उभारून तयार केला जाईल. - तुषार काळे, उप-अभियंता, साबांवि.
नव्याची लांबी - रुंदी सध्याच्या पुलाप्रमाणेच सध्याच्या रेल्वे पुलाची व नव्या पुलाची लांबी व रुंदी सारखीच राहणार आहे. कारण या पुलाच्या दोन्ही बाजूला दुकाने,इमारती आहेत. सध्याच्या रॅम्प पुलामुळे अनेक मार्ग बंद झालेत. मात्र व्हायडक्ट नव्या पुलाच्या निर्मितीनंतर अंबापेठमधून थेट जयस्तंभ चौकाकडे जाता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.