आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मंगरुळपीर येथे नेत्र तपासणी शिबिर

मंगरूळपीर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितलांगे इंण्डेन १ सप्टेंबर रोजी स्थानिक चारभुजा मंदिरामध्ये विविध उपक्रमांनी शेकडो ग्राहकांच्या व मित्र परिवार कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या प्रसंगी डॉ. प्रणय महल्ले विठाई हॉस्पिटल अकोला, नेत्ररोग तज्ञ डॉ.मनिष पावसे वाशिम, डॉ.स्विटी गोटे (दहातोंडे), मनिष भुतडा अकोला, डॉ.जयंत पिंपरकर, डॉ.डाळे रक्त पथपेठी व स्टेट बँकेचे कर्मचारी या सर्वांनी या शिबीरात रुग्ण व विमा सेवा दिली.

या शिबिरामध्ये ५२० रुग्णांनी निशुल्क लाभ घेतला तर २५० महिलांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घेतला. तसेच ३१ जणांनी रक्तदान केले. यासोबतच वृक्षारोपण, फळवाटप, अन्नदान असे विविध कार्यक्रम चितलांगे इण्डेन, मित्र परिवार, यांनी केले. या उपक्रमात मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...