आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी मोठं गिफ्ट दिलं..!:आमदार बच्चू कडूंनी सांगितला 'तो' किस्सा; शिंदे सरकारमध्ये का सहभागी झालो, अखेर फोडले गुपित

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी कोणते मोठे गिफ्ट दिले, शिंदे सरकारमध्ये का सहभागी झालो, याची सविस्तर उत्तरे आज अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील 20 हजार हेक्टर सिंचनाखाली येणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिली. खास करून मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून हे सांगितले की, ''आज तुम्हाला अधिक चांगले गिफ्ट देणार आहोत." 20 हजार हेक्टर सिंचनाखाली येणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने माझ्या मतदारसंघातील शेतकरी आनंदी होत असेल तर ते माझ्यासाठी महत्वाचे आहे, असे कडू म्हणाले.

आता गोंंधळ नकोच

बच्चू कडू म्हणाले, राणांशी वाद करायचा नाही. ते काल तीन वाजता काय म्हणाले की, वाद मिटला. पुन्हा सायंकाळी सहा वाजता म्हणतात की, घरात घुसून मारेल. आज म्हटले की, पुन्हा वाद मिटला. हा गोंधळ वाढत आहे, म्हणून मी ठरवले की, मनात जास्त गोंधळ करू नये आणि राज्यातही गोंधळ वाढू नये.

बच्चू कडू यांनी सांगितले की, राणा म्हणाले की, गुवाहाटीला गेले पन्नास खोके घेऊन आलो. हे चुकीचे आहे. मी स्वःतहून रवी राणांना भेटणार, आज संध्याकाळीच भेटणार आहे. पत्रकारांना मेसेजही देईल. आम्ही दोघे एका पंगतीत बसू. लोकांच्या विकासासाठी दोघे एकत्र येऊ.

म्हणून मला आनंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील वीस हजार हेक्टर सिंचनाखाली येणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिली. खास करून मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितले की, आज तुम्हाला अधिक चांगले गिफ्ट देत आहोत. माझ्या मतदारसंघातील शेतकरी यामुळे आनंदी होत असेल तर ते माझ्यासाठी महत्वाचे आहे.

विकासाठी एकत्र येऊ

बच्चू कडू म्हणाले, केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर चांगली शाळा करतात, माझा कार्यकर्ता काहीही न होता चांगली शाळा करेल मी असे म्हटलो होतो. जिल्हा, आणि राज्याच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ.

म्हणून सत्तेत सहभागी

बच्चू कडू म्हणाले, माझ्यावर तीनशे गुन्हे दाखल आहेत. आम्ही 81 शासन निर्णय काढले. एक हजार कोटी दीव्यांगाना दिले जात आहेत हा आमच्या आंदोलनांचा परिणाम आहे. या लोकांनी मला चारवेळा निवडून दिले. एवढे त्यांचे उपकार माझ्यावर आहेत. मी त्यांना विचारले की, आता काय करू ते म्हणाले, विरोधात बसू नका, विकासकामे बाकी आहेत. म्हणून मी सत्तेत सहभागी झालो. मी सत्तेत झालो नसतो तर आमच्या मतदारसंघातील विकासाची कामे रखडली असती.

बातम्या आणखी आहेत...