आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुटुंब नियोजन; पुरुषांनी पुढाकार घ्यावा; डीएचओ डॉ.रणमले;शस्त्रक्रियेचा भार केवळ मातांवरच नको

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटूंब नियोजन व लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कुटूंबाचा जबाबदार घटक म्हणून पुरुष मंडळींनीही या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेण्याची गरज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी व्यक्त केली.

शस्त्रक्रियेचा भार केवळ मातांवर नको. ग्रामीण भागात काम करताना अनेक नागरिकांमध्ये अंधश्रद्धा, आरोग्‍याबाबत अपूर्ण माहिती असल्याचे आरोग्य पथकांना आढळून येते, असे सांगून डॉ. रणमले म्हणाले की, पुरुष गर्भनिरोधक साधनांमध्‍ये तात्पुरते साधन म्हणून निरोध आणि कायमच्‍या कुटुंब नियोजन पद्धतीमध्‍ये पुरुष शस्त्रक्रियेचा समावेश होतो. एकूण वर्षभरात होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांचे प्रमाण फक्‍त ५ टक्‍के इतके आहे. शस्त्रक्रियेचा भार कुटुंबातील मातांवर टाकला जातो. वास्तविक पुरुष शस्त्रक्रिया ही स्त्री शस्त्रक्रियेच्या तुलनेत अत्यंत सोपी व कमी वेळात होणारी शस्त्रक्रि‍या आहे.

त्यामुळे पौरूषाला कुठलीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे या शस्त्रक्रियांचा अवलंब करण्यात पुरुषांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. कुटुंब नियोजनामुळे लोकसंख्येला आळा बसतो, तसेच कुटुंबातील स्त्रीचे आरोग्‍य चांगले राहून मानसिक आरोग्‍य उंचावण्‍यास मदत होते.

बातम्या आणखी आहेत...