आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे प्रतिपादन प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर यांनी केले. शहरातील प्रबोधन विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे नुकताच निरोप समारंभ व परीक्षेसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य रेवस्कर बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य नरेंद्र गोंडाणे, उपमुख्याध्यापिका शोभा भिसे, पर्यवेक्षक प्रतिभा संत, राजकुमार बावनकुळे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम संस्थेचे संस्थापकद्वय मामा क्षीरसागर, बाबा रेड्डीकर व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दरम्यान उपस्थित वर्गशिक्षक, विषय शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आठवण म्हणून या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेटवस्तू दिल्यात. विद्यार्थ्यांचे विद्यालय व शिक्षकांवरील प्रेम पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार बावनकुळे, सूत्रसंचालन मनोज राठी, तर आभार प्रदर्शन माधुरी पवार यांनी केले. या कार्यक्रमाला इयत्ता दहावीचे जवळपास ३०० विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.