आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा आर्त टाहो:पंचनाम्यासाठी पैसे दिले पण नुकसान भरपाई नाही, अर्ज नोंदणी शिबिरात शेतकऱ्यांची खंत

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान झाले. सुरूवातीला पिक विमा केला असल्याने पंचनामा करावा म्हणून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला. अधिकारी आले पंचनामा केला आणि पंचनामा करण्यासाठी पैशांची मागणीही केली. मात्र पिक विम्याच्या रकमेचा छदाम ही मिळाला नसल्याची खंत येथील तालुका कृषि कार्यालयात आयोजित अर्ज नोंदणी शिबिरात शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) आयोजित केलेल्या शिबिरात पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अर्ज नोंदणी शिबिरात सुमारे 450 शेतकऱ्यांनी आपली कैफीयत मांडली.

या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची पिके खरडून गेली. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र हंगामाच्या सुरूवातीलाच पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या पिकांचा पिक विमा उतरविला असल्याने पिक विम्याच्या पैशातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची चिन्हे होती. मात्र, पिक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त पिकांचा पंचनामाच केला नसल्याची खंत या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची गोची करणाऱ्या पिक विमा कंपनीविरुध्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. चेतन परडखे यांनी मोहीम उघडली असून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्याकरिता धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तिनही तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी दिवसभर अर्ज स्वीकारणऱ्यात येत आहे.

त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुका कृषि कार्यालयात शुक्रवारी 450 शेतकऱ्यांनी पिक विमा मिळाला नसल्याने अर्ज नोंदणी केली आहे. हे सर्व गोळा झालेले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पिक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांचे अर्ज घेणे सुरू असल्याची मला माहिती मिळाली. ते सर्व अर्ज गोळा करून कंपनीला पाठवू, अशी माहिती प्रभारी तालुका कृषि अधिकारी राजेश वालदे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...