आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाईपासून वंचित:बँकेकडे चुकीचे आयएफएससी कोड, खाते क्रमांक दिल्याने शेतकऱ्यांना भरपाई नाही

शेंदुरजनाघाट20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड तालुक्यात या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले. त्या अनुषंगाने शासनाने वरुड तालुक्याला नुकसान भरपाईकरिता अनुदान मंजूर करून तत्काळ तहसीलदारांकडे वर्ग केले. मात्र, संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तयार करून बँकेकडे सोपवलेल्या याद्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे बँक खाते व ‘आयएफएससी’ कोड चुकीचे असल्याने त्यांना या भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या चुकीचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वरुड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक जमा करण्याकरिता महसूल विभागाने काही गावे तलाठी, तर काही गावे ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडे वर्ग केली होती. त्यानुसार बँक खाते क्रमांक व बँकेचे आयएफसी कोड शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. त्या याद्या वरुड येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. कार्यालयाने त्या याद्या जशाच्या तशा बँकांकडे दिल्यात.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीआधी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत मिळणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु प्रशासनाद्वारे तयार करण्यात आलेल्या सदोष याद्यांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. ही बाब भाजपचे तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी ती तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देत याद्या दुरूस्त करण्याची मागणी केली.

निवेदन देतेवेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राउत, शहराध्यक्ष डॉ. नीलेश बेलसरे, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल मालपे, जिल्हा सचिव इंद्रभूषण सोंडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय यावले, योगेश्वर खासबागे, सरचिटणीस समीर ठाकरे, रुपाली सोंडे, राजू शहाणे, शक्ती केंद्रप्रमुख संजय कोहळे, माजी नगरसेवक प्रितम अब्रुक, रवी निंभोरकर, भाजयुमो शहर उपाध्यक्ष यशपाल राऊत, गोविंदा कवडेती यांच्यासह भाजप कार्यकर्ते व शेतकरी यैवोळा उपस्थित होते.

लकवरच याद्या अपडेट करून बँकांकडे पाठवू बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले आहेत. जवळपास ५ ते १० टक्के शेतकरी असे आहेत, ज्यांची माहिती चुकलेली आहे. लवकरच त्यांचीही माहिती अपडेट करून ती त्वरित संबंधित बँकांकडे पाठवण्यात येईल. कुणीही शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही. -गजेंद्र मालठाणे, तहसीलदार, वरुड

बातम्या आणखी आहेत...