आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या मृग नक्षत्रास सुरूवात झाली असून ७ जून पर्यंत केवळ १.९ मिमी पाऊस झाला आहे. येत्या १४ ते १५ जूनपर्यंत मोसमी वारे सर्वत्र पोहोचून महाराष्ट्रात सार्वत्रिक पावसास सुरूवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सलग तीन दिवस ८० ते १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस होऊन ओलावा २.५ ते ३ फुटापर्यंत निर्माण होत नाही, तोवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी केले.
पावसाचे उशिरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतर पडणारा खंड यामुळे पेरणी व पिके वाया जाऊन श्रम आणि आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसतो. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
११ ते १५ जूनदरम्यान पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार ११ ते १५ जूनदरम्यान हवामान काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहिल, असा अंदाज कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे डॉ. सचिन मुंढे यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.