आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात सोमवारी सकाळी एका अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांचे नाव सज्जुलाल सानू भिलावेकर (वय ३४ वर्षे) आहे. सज्जुलाल यांच्यावर बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ढाकणा वनपरिक्षेत्राच्या अती संरक्षित जंगलात अस्वलांचे लागोपाठ हल्ले सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत.
तीन वर्षातील आज झालेल्या अस्वलाच्या हल्ल्याची दाबिया येथील ही तिसरी घटना आहे. रखरखत्या उन्हात वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे येत आहेत. दोन वर्षापासून मे महिन्यातच झिंलागपाटी येथील दोन आदिवासी मजुरांना अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. गुगामल वन्यजीव विभागाच्या जंगलात वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी कृत्रीम पाणवठ्यावर वन्यप्राणी तहान भागवण्यासाठी सहजासहजी टाळतात.
दरम्यान, आज सकाळी सज्जुलाल हा शेतकरी शेताची पाहणी करण्यासाठी जंगलातून जात असताना अचानक एका अस्वलाने पाठीमागून हल्ला चढवला. त्याने प्रतिकार करून अस्वलीचा हल्ला परतून लावला. तेवढ्यात हातीदा येथील संरपच गंगा जावरकर यांना हे दृश्य दिसले. त्यांनी जखमी सज्जुलाल यांना बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सज्जुलालची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.