आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरी:खरेदी केंद्रासाठी शेतकरी पोहोचले जिल्हा कचेरी ; नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्याच्या १७ तारखेपासून नाफेडचे चना खरेदी केंद्र अचानक बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना चना विक्रीसाठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद पडलेले चना खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करण्यात यावे, या मागणीला घेऊन शेतकरी जिल्हा कचेरीवर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत महिन्यात सतरा तारखेपासून नाफेडचे चना खरेदी केंद्र अचानक बंद केले. नाफेड बंद पडल्यामुळे खुल्या बाजारात चन्याचे भाव कमालीचे पडले आहे. नाफेडची चना खरेदी ही ५२४० रुपये असून प्रति क्विंटल १२०० रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची लूट थांबवावी. ज्या शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर नावनोंदणी केली, पण शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप झाले नाही असे अनेक शेतकरी आहेत. त्यामुळे नाफेड केंद्र सुरू करावे, मालाची मोजणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी प्रहार चे कृणाल वानखडे, अमर मोहोड, गजानन वानखडे, हरिभाऊ अलोने, अशोक डहाडे, दिलीप सोळंके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...