आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी:नुकसानभरपाईसाठी संत्र्यांच्या माळा घालून तहसीलवर पोहोचले शेतकरी

तिवसा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई ताबडतोब मिळण्याबाबत

युवक काँग्रेसच्या नेतृत्वात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत व सडलेल्या संत्र्याचा हार घालून निवेदन सादर केले.

यापूर्वीही कोरडा दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा एक ना अनेक आपत्तीची शिकार ठरलेल्या संत्रा उत्पादकांना मदतीचे गाजर दाखवून शासनाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. यावर्षी पहिल्यांदाच शासनाने फळ बागांचे नुकसान ग्राह्य धरून फळबागांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवर उभ्या असलेल्या फळबागधारकांना या मदतीची आस लागली आहे. तरी लवकरात लवकर संत्रा उत्पादकांना मदत मिळावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडून तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांच्याकडे केली.

सन २०२१-२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसह आंबिया बहाराच्या संत्र्यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तेव्हा लगतच्याच तालुक्यातील संत्रा उत्पादकांना शासकीय मदत प्राप्त झाली. परंतु तिवसा तालुक्यातील शेतकरी मात्र अद्यापही मदतीपासून वंचित आहे. यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी जसबीर ठाकूर, गजानन तिजारे, राजिक शेख, प्रशांत प्रधान, अंकुश बायस्कर, शफीक शहा, आशिष बायस्कर, स्वप्नील तुरकाने, अरविंद चोपकर, सूरज धुमनखेडे, प्रवीण बारई, समीर डहाके, किरण पाचघरे, मंगेश वाघमारे, वैभव साबळे, आशिष घाटोळ, अनुप उमप, राजेश धुमंनखेडे, राजन सिराडकर, सचिन बारवाल, सय्यज्याद मुल्ला, पंकज उमप, धनराज खराटे, प्रवीण बेले, प्रफुल लोमटे, गौरव डोंगरे, दिनेश ठोसर, लक्ष्मीकांत पाचघरे, नरेंद्र माहुरे, प्रफुल बायस्क, शिवदास बायस्कर, शामसुंदर बायस्कर, नरेंद्र बायस्कर, हर्षल बायस्कर, भगवंतराव मुंद्रे, अनुराग बायस्कर, आशिष कांडलकर, हरिभाऊ खेरडे आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...