आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवदा:वीजेअभावी कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची फरपट; येवद्याच्या तलाठी कार्यालयाचा महावितरणने केला वीज पुरवठा खंडित

येवदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापुर तालुक्यातील येवदा तलाठी कार्यालयाकडे गेल्या काही वर्षांपासून वीज बिल थकीत असल्याने बिलाचा भरणा न झाल्याच्या कारणावरून महावितरणने कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. पारा वाढला असताना विना पंखा कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे, तर विजेअभावी ऑनलाइन कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या कार्यालयाकडे जवळपास २२ हजार ८३० रुपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत बिलाचा भरणा महावितरणकडे केल्याशिवाय खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरू होणार नाही, याची महसुल विभागाला माहिती असून सुध्दा जिल्हा व तहसील प्रशासनाकडून अध्यापही थकीत विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे तलाठी कार्यालयातील थकीत बिल केव्हा भरणार व केव्हा विद्युत पुरवठा सुरळीत होईल, याची प्रतीक्षा कर्मचाऱ्यांसह नागरिकांना लागली आहे.

शेतकऱ्यांना मात्र लाईट नसल्याने ७/१२ व इतर दाखले प्राप्त करण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे शेतीकर्ज घेण्यासाठी ७/१२ व ८-अ वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना व तलाठी कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची कामे कार्यालयात विद्युत पुरवठा नसल्याने खोळंबली आहेत. तलाठी कार्यालयाला विद्युत पुरवठा विद्युत बील भरून विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हा व तालुका महसुल विभागाला ‘प्रहर’चे प्रदीप वडतकर यांनी वारंवार माहिती दिली, परंतु या बाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही.

बातम्या आणखी आहेत...