आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री दौऱ्यावर असताना शेतकरी पुत्राची आत्महत्या:लाकटू येथे विषारी द्रव्य प्राशन करून दिला जीव, अतिवृष्टीमुळे पीक झाले होते नष्ट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे 'एक दिवस बळीराजासोबत' या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी मेळघाटचा दौरा करत आहेत. दुसरीकडे याच दिवशी ते मुक्कामाला असलेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटर दूर लाकटू गावात एका शेतकरी पुत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

अनिल सुरजलाल ठाकरे (26, रा. लाकटू), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लाकटूत मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि अनिलच्या म्रुत्यूची तातडीने चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ

अतिवृष्टीमुळे शेतजमीन संकटात येऊन पिके नष्ट झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या या तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून संपूर्ण यंत्रणा हादरुन गेली आहे.

'माझा एक दिवस बळीराजा'साठी

'माझा एक दिवस बळीराजा'साठी या कृषी विभागाच्या राज्यस्तरीय उपक्रमाला मेळघाटमधून सुरुवात झाली. धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्रीच दाखल झाले. तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्याने कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीतही आत्महत्यांचा फास आवळण्यापासून थांबविता येत नाही. हे कटू सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

अतिवृष्टीमुळे पीक नष्ट

यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरूच आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अजूनही मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने ठाकरे कुटुंबीय चिंतेत होते.

शासन ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी-सत्तार

दरम्यान एका युवक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कृषी मंत्र्यांनी तत्काळ धाव घेऊन या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले. अनिल ठाकरे या 26 वर्षीय शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांनी संवाद साधून आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. शिवाय भविष्यात शेतकरी म्हणून त्यांना आवश्यक असलेल्या मदतीचे आश्वासन दिले.

मेळघाट दौऱ्यावर असताना या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ लाकटूकडे धाव घेतली. शासन ठाकरे कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...