आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवार २१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली. वडिलोपार्जित जमिनीसंदर्भातील वादावर प्रशासनाद्वारे तोडगा काढला जात नसल्याने त्रस्त झालेल्या चांदूर बाजार तालुक्यातील रमेश किसन तंतरपाळे या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांचा धाकटा बंधू संजय तंतरपाळे यांनी दिली. रमेश यांनी विष प्राशन केल्यानंतर तेथील तैनात पाेलिस व काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उचलले टोकाचे पाऊल
वडिलोपार्जित ३.५ एकर जमिनीबाबत प्रशासनासोबत वाद सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तोडगा काढावा म्हणून गेल्या दोन आठवडयांपासून रमेश हे दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात येत होते. परंतु, जिल्हा प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे त्यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागले. -संजय किसन तंतरपाळे, (रमेश तंतरपाळे यांचा लहान भाऊ)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.