आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:वीज जोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

दर्यापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला. मात्र पाठपुरावा करूनही वीज जोडणी न मिळाल्यामुळे शिंगणापूर येथील एका त्रस्त शेतकऱ्याने सोमवारी दर्यापूर येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात ज्वालाग्रही द्रव्य सोबत आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

तालुक्यातील शिंगणापूर येथील शेतकरी अमोल मनोहरराव जाधव यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती असून त्यांना त्या शेतीवर ओलीत करायचे असल्याने त्यांनी कृषी पंप बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी दर्यापुरातील उपविभागीय वीज वितरण कार्यालयात कृषी पंपासाठी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांना अद्याप वीज जोडणी दिली नाही. वारंवार वीज वितरण कार्यालयात चकरा मारूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संतप्त शेतकरी अमोल जाधव यांनी सोमवारी थेट दर्यापूर येथील महावितरण कार्यालय गाठले व स्वतःच्या अंगावर ज्वालाग्रही द्रव्य घेणार तोच तेथील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अमोल जाधव यांच्या हातातील ती बाटली हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला.

म्हणून जोडणी झाली नाही
सदर शेतकऱ्याचा वीज जोडणीचा प्राप्त अर्ज २०२० मध्येच मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी कार्यालयाशी कधीही संपर्क न केल्याने त्यांची वीज जोडणी होऊ शकली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. राजेश अजमिरे, सहायक अभियंता, वीज वितरण उपकेंद्र, खोलापूर.

बातम्या आणखी आहेत...