आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Farmers ... Throw Mud From The Pond Into The Field; District Collector's Order To Revive Water Resources By Increasing Productivity |marathi News

दिव्य मराठी विशेष:शेतकऱ्यांनो... तलावातील गाळ शेतात टाका; उत्पादकता वाढवून पाणीसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाशीम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे. मोठे सिंचन प्रकल्प जिल्ह्यात नाही. त्यामुळे सिंचन क्षेत्र कमी आहे. जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून सरकारच्या निती आयोगाने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. जिल्ह्यातील १० हेक्टर क्षेत्राच्या आत असलेल्या बांध व तलावांचे खोलीकरण करुन तलावातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पुढे यावे आणि पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.

४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसोड तालुक्यातील रिठदजवळील जवळपास ४ हेक्टर क्षेत्र असलेल्या मुर्डेश्वर पाझर तलाव आणि नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील १ हेक्टर क्षमतेच्या पाझर तलावाची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोरकर, पंचायत समिती सदस्य गजानन आरु, ग्रामपंचायत सदस्य उतमराव आरु, बालाजी बोरकर, गणेश आरु, जमीलखाँ पठाण, माजी सरपंच बळीराम बोरकर, ज्ञानबा बोरकर, नारायण आरू, रामेश्वर आरु व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात येत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या परिसरात असलेल्या १० हेक्टरपर्यतच्या बांध/तलावाच्या खोलीकरणासाठी पुढे यावे. तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकल्यास शेतीची सुपीकता वाढेल आणि पिकाची उत्पादन क्षमता वाढल्यास मदत होणार आहे. या तलाव/ बांधातील गाळ काढण्याचे येणार असल्यामुळे पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन होण्यास देखील मदत होणार आहे. तलाव परिसरातील शेतकऱ्यांना काही महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होवून भू गर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे षन्मुगराजन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा. त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिठद येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून जवळपास ३० ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात टाकण्याचे काम करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...