आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड तालुक्यातील नांदगाव येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेत शेजाऱ्यासोबत रस्त्याचा वाद आहे. दरम्यान, दि.२६ मे रोजी ४५ वर्षीय शेतकरी शेतातून घरी जात असताना रस्त्याचा वाद असलेला शेतकरी भेटला. यावेळी त्या शेतकऱ्याने मारहाण केली तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी शिवीगाळ केली तसेच एकाने विष्ठा आणून ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार ४५ वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी (दि. २) बेनोडा पोलिसात दिली आहे. यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन आत्मारामजी बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव, वरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघांचे नाव आहे. या प्रकरणातील ४५ वर्षीय शेतकरी व बुरंगे यांच्यात शेताच्या रस्त्याचा वाद सुरू आहे. २६ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ४५ वर्षीय तक्रारदार शेतकरी शेतातून गावात येत होता. त्याचवेळी बबन बुरंगे व अन्य तिघे त्याच मार्गाने जात होते. त्यावेळी बबन बुरंगेने तक्रारदार ४५ वर्षीय शेतकऱ्याला सुरूवातीला बोलचाल करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच काठीने हातापायावर मारले. याचवेळी भूषण बुरंगे याने राजा ठाकरे याला विष्ठा आणयला सांगून खाण्यास भाग पाडले, असा खळबळजनक आरोप तक्रारदार शेतकऱ्याने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. याचवेळी सुरेश बुरंगे व भूषण बुरंगे यांनी शिवीगाळ केली. असेही तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी २ जूनला तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध मारहाण करणे तसेच विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचा आरोप असल्यामुळे, ज्या कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आजाराचे संक्रमण होईल, असे कृत्य करणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...