आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ देण्याची मागणी:फासेपारधी बांधव घरकुल योजनांपासून वंचित ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील देवगाव येथील राहणाऱ्या फासेपारधी समाज बांधवाना गावातील समाज मंदिर उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे गेल्या पन्नास वर्षांपासून अदिवासी फासे पारधी बांधव वास्तव्यास आहे. मात्र, अजूनही नागरी सुविधांपासून वंचीत असल्याचा आरोप समाज बांधवानी केला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नागरिकांच्या घरांची पडझड, अन्न धान्य वाहून गेले आहे. त्यामुळे गावातील सरपंच यांना गावातील समाजमंदिर राहण्यासाठी खुले करून देण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, सरपंच यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे फासे पारधी समाज संघटनेचे म्हणणे आहे.

तसेच आदिवासी फासे पारधी समाज बांधव घरकुल योजनेपासून वंचीत राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, तसेच गावातील समाज मंदिर उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी आदिवासी फासे पारधी समाज संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.यावेळी अध्यक्ष संतोष पवार, मनोज सोळंके, बाबूशिंग पवार, सलीम भोसले, झब्बू पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...