आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनादेश वाटप:जमिनीचा मोबदला मिळण्याच्या‎ मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण‎

कुऱ्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा तालुक्यातील निम्मवर्धा‎ प्रकल्पातील धारवाडा, कौंडण्यपूर व‎ छिदवाडी येथील भूसंपादित शेतकऱ्यांना‎ मोबदल्याचा धनादेश वाटप न केल्यामुळे या‎ गावांमधील शेतकऱ्यांनी मंगळवारपासून (दि.‎ ११) धारवाडा बस स्टॉप येथेबेमुदत‎ उपोषणाला बसले आहेत. निम्म वर्धा‎ धरणाच्या पाण्यात बुडालेल्या जमिनीचा‎ अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला‎ नाही. त्यासाठी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या‎ भेटी घेवून ही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच न‎ पडल्याने संतप्त झालेले शेतकरी प्रकाश थोटे,‎ मनोहर इंदोरे, सुधाकर रताळे, साहेबराव राठोड,‎ संदीप काळे, वामन भगत, बाबुराव केवदे, श्याम‎ इंदोरे, गुणवंत म्हात्रे, महेंद्र पखाले, कवडू‎ बनसोड, नामदेव तांबे, भिमराव भिल आदींनी‎ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा, अशी मागणी‎ करत बेमुदत उपोषण पुकारले आहे.‎