आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाविरुद्ध गुन्हा:तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायण मठ मंदिराच्या मार्गावरून सायकल घेऊन जाणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणावर २५ वर्षीय तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या वेळी हल्लेखोराने जखमी तरुणाच्या डोक्यावर तसेच मानेवर, कानावर, ओठावर, छातीत, हातावर व पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे.

राजेश संजय अंगतकार (३१, रा. गांधी आश्रम, अमरावती) असे जखमी तरुणाचे तर धीरज ऊर्फ बुन्नू विजयसिंग बघेल (२५, रा. खरकाडीपुरा, अमरावती) असे हल्लेखोराचे नाव आहे. राजेश अंगतकार शुक्रवारी सायंकाळी सायकलने नारायण मठ मंदिर परिसरातून जात असताना धीरज भेटला. यावेळी धीरजने राजेशला म्हटले, की तुझी बहीण व भाची माझ्या विरोधात पोलिस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी गेल्या आहे. त्यांना समजावून सांग.

माझी पत्नी व मुलगा माझ्यापासून दूर गेले, तर एकाएकाला खतम करून टाकणार, अशी धमकी दिली. या वेळी राजेशने मला काही सांगू नको, असे धीरजला म्हटले. यावरून धीरजने जवळचा चाकू काढला आणि राजेशच्या डोक्यावर मारला. त्यामुळे राजेश खाली पडला. त्यावेळी धीरजने त्याच्या मानेवर, कानावर, ओठावर, छातीत, हातावर, पोटात चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात राजेश गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी राजेश अंगतकारच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी धीरज ऊर्फ बुन्नू बघेलविरुद्ध जीवघेणा हल्ला करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...