आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा हल्ला:बहीण-भावावर चाकूने जीवघेणा हल्ला

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेनोडा भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणावर चौघांनी घरात जाऊन चाकूने सपासप वार केले. यावेळी भावाच्या बचावासाठी आलेल्या बहिणीवरही हल्लेखोरांनी वार केले. या चाकू हल्ल्यात दोघेही बहीण भाऊ गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार हल्लेखोरांना शनिवारी (दि. १०) पहाटे अटक केली आहे.

रोहित ऊर्फ नादो विजय भोंगळे (२५) व सोनू विजय भोंगळे (दोघेही रा. बेनोडा) अशी जखमी बहीण-भावाचे नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण ऊर्फ पिंटू भीमराव बनसोड (३९), रूपेश भीमराव बनसोड (४२, दोघेही रा. बेनोडा जहागीर), अमोल दिनेशराव जोंधळे (३८, रा. भीमटेकडी) आणि सै. नाजिम सै. सत्तार (३२, राहुलनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री रोहीत ऊर्फ नादो हा घराच्या अंगणात उभा असताना प्रवीण बन्सोड, रूपेश बन्सोड आणि अनिल जोंधळे तसेच एक अनोळखी व्यक्ती असे चार जण त्याच्या घरात चाकू घेऊन शिरले. येताना चौघांनी ‘नादो, आता तुला सोडणार नाही, तू आमच्या हाताने मरणार’ असे म्हणून जोरजोराने शिवीगाळ करीत व हातातील चाकू फिरवत येत असताना आजूबाजूचे लोक भीतीने आपापले घरात पळून गेले.

त्यावेळी अंगणात असलेल्या नादोवर चौघांनी मिळून चाकूने सपासप वार केलेत. नादोला भोसकत असल्याने त्याची आई व बहीण सोनूमध्ये गेल्या. मात्र, हल्लेखोर थांबले नाहीत. त्यांनी नादोच्या पाठीवर, डोक्यावर, पोटावर चाकूने वार करून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले, तर सोनूच्या हातावर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले.

बातम्या आणखी आहेत...