आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीयांची पोलिसात तक्रार‎:वडिलांनी रागाच्या भरात मोबाईल आपटला, 15 वर्षीय मुलीने रागाच्या भरात घरच सोडले

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहाव्या वर्गात‎ शिकणाऱ्या मुलीच्या हातातील‎ मोबाइल घेऊन वडीलांनी तो खाली‎ आपटला. त्यामुळे मोबाइल फुटला.‎ मोबाइल फोडल्याचा राग मनात‎ धरुन दहाव्या वर्गात शिकणारी १५‎ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. या‎ प्रकरणी कुटुंबियांनी तळेगाव‎ पोलिसांत तक्रार दिली असून‎ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‎

पंधरा वर्षीय मुलगी ७ मे रोजी‎ सायंकाळी घरीच मोबाइल पाहत‎ होती, त्यावेळी तिच्या भावानेसुद्धा‎ मोबाइल मागितला. मात्र, मुलीने‎ काही त्याला मोबाइल दिला नाही.‎ त्यावेळी मुलीचे वडील त्या ठिकाणी‎ आले व त्यांनी मुलीच्या हातातून‎ मोबाइल हिसकला आणि तो‎ जमिनीवर आपटला. त्यामुळे‎ मोबाइल फुटला. मोबाइल‎ फुटल्यामुळे मुलीला राग आला व‎ हाच राग मनात धरुन ती घरातून‎ बाहेर पडली.

ही घटना ७ मे रोजी‎ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास‎ घडली. ती बराच वेळ घरी न‎ आल्यामुळे कुटुंबियांना तीच्या‎ मैत्रिणींकडे तसेच गावात तिचा शोध‎ सुरू केला मात्र ती काही दिसली‎ नाही. त्यानंतर कुटुंबियांनी‎ शोधमोहीम सुरूच ठेवली. दरम्यान,‎ बसस्टँडवर विचारणा केली असता‎ ती चांदूर रेल्वे मार्गाने पायी गेल्याचे‎ सांगण्यात आले. मात्र ८ मे रोजी‎ रात्री पर्यंतही ती घरी आली नव्हती.‎