आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करून द्या.. म्हणताच:दारुड्या मुलावर वडिलांनी चालवली कुऱ्हाड, अंजनगांव सुर्जी तालुक्यातील घटना, पित्याला 1 दिवस कोठडी

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गावंडगाव येथे रविवारी रात्री ९ वाजता दारुड्या मुलावर वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घातला. लग्न करून द्या, असा त्याचा हट्ट होता. या वादात पित्याने लहान मुलांच्या साह्याने त्यास मारहाण केली. यातील जखमीचे नाव श्रीकृष्ण थोरात असून त्यास मारहाण करणाऱ्या पित्याचे नाव समाधान थोरात तर त्याच्या भावाचे नाव समाधान थोरात आहे. दोन्ही आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गावंडगाव येथील रहिवासी पंचफुला समाधान थोरात यांच्या तक्रारीवरुन रहिमापूर पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदविला आहे. श्रीकृष्ण समाधान थोरात याचे काही वर्षाआधी लग्न झाले होते. परंतु पत्नी सोबत वाद झाल्यामुळे ती त्याला सोडून निघून गेली. त्यामुळे श्रीकृष्ण हा नेहमी दारू पिऊन वडिलांसोबत भांडण करीत होता. माझे दुसरे लग्न लावून द्या, असा त्याचा आग्रह होता. परंतु तू दारुडा असल्यामुळे तुला कोणीही मुलगी देणार नाही, असे सांगत समाधान थोरात त्याला सुधारण्याची ताकीद देत होते. परंतु तो ऐकत नव्हता, असे तक्रारीत लिहले आहे.

दरम्यान समाधान तुकाराम थोरात (वय ६७) व रामकृष्ण समाधान थोरात (वय ३३) हे दोघे बापलेक शेतात हरभरा पिक असल्यामुळे राखणदारी करीत होते. तेथे श्रीकृष्ण दारू पिऊन गेला. पुन्हा जुनीच मागणी त्याने रेटली. यावेळी त्याने पुन्हा वडिलांसोबत वाद घातला. माझे लग्न करून द्या नाहीतर तुम्हाला इथेच गाडतो, अशी तो धमकी देऊ लागला. या धमकीमुळे समाधान थोरात व त्याचा भाऊ रामकृष्ण थोरात त्रस्त झाले. दरम्यान रामकृष्णने श्रीकृष्णला पकडून ठेवले. त्याच दरम्यान वडील समाधान थोरात यांनी रागाच्या भरात कृष्णाच्या डोक्यात हातातील कुऱ्हाडीने सपासप दोन वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला

आणि जखमी अवस्थेतच तो तेथून पळून गेला. त्यानंतर घरी येऊन समाधान थोरात यांनी हा घटनाक्रम आपल्या पत्नीस सांगितला. त्यानंतर ते दोघेही जखमी श्रीकृष्ण यास शोधण्यास गेले. परंतु तो दिसून आला नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

त्यानंतर दोघांनीही पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितले. पुढे पोलिसांनी जखमी श्रीकृष्णचा शोध घेऊन खाजगी वाहनाने त्याला अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. फिर्यादीच्या तक्रारीवरून रहीमापुर चिंचोली पोलिसांनी कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आज, सोमवारी न्यायालयात हजर केले. अंजनगांव सत्र न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...