आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:परतवाड्यात गाडगेबाबा पाणपोईवर पडलेल्या वृक्षामुळे अपघाताची भीती

परतवाडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तहसील कार्यालयापासून परतवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावरील गाडगेबाबा पाणपोईनजीक वळण रस्त्यावर एक झाड मुळासकट तुटून पडले असून ते दुसऱ्या झाडावर आधार घेऊन आहे.

त्यामुळे वादळी पावसात हे झाड केव्हाही रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची भीती आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ हे तुटलेले झाड बाजूला करणे गरजेचे आहे. या मार्गावर विद्यार्थी, शासकिय कर्मचारी, श्रमिक ये-जा करतात. पालिका प्रशासनाने या बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी ॲड. नितीन घाटेवार यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...