आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार!:श्वानाच्या शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, श्वान आणि बिबट्या दोघांनाही सुखरूप काढले बाहेर

अनुप गाडगे, अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगत बिबट्याचे वास्तव्य वाढत चाललेले आहे. मानवी वस्तीपर्तंत बिबट्याचा शिरकाव झाला आहे. बडनेरा-अंजनगाव बारी मार्गावर अंबाडकर यांच्या शेतात शुक्रवारी रात्री बिबट्या श्वानाची शिकार करताना श्वान व बिबट्या दोघेही या विहिरीत पडले. विहिरीत असलेल्या एका ओंढक्यावर श्वान आणि बिबट्या दोघेही आपला जीव वाचवण्याची धडपड करत होते.

बिबट, श्वान दोघांनाही सुखरुप बाहेर काढले

दरम्यान, शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शेत मालक अरविंद अंबाडकर शेतात गेले असता त्यांना विहिरीत बिबट व श्वान पडले असल्याचे लक्षात आले त्यामुळे तात्काळ त्यांनी वन विभागाच्या पथकाला जाऊन माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुमारे दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने विहिरीत पडलेला बिबट आणि श्वान दोघांनाही बाहेर काढले. विहीर सुमारे 40 ते 50 फूट खोल असून सध्या यामध्ये 25 ते 30 फूट पाणी आहे. यावेळी वनविभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला वर काढले.

वनविभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला वर काढले
वनविभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला वर काढले

या पथकामध्ये आरएफओ सचिन नवरे, आरएफओ कैलाश भुंबर, अमोल गावनेर, विनोद ढवडे, सुरेश मनगटे, फिरोजखान, मनोज माहुलकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, सुरज भांबुरकर, आसिफ पठाण आणि प्रशांत खाडे या जवानांचा समावेश आहे.

सतरा ते अठरा महिन्याचा आहे बिबट
आंबाडकर यांच्या शेतातील विहिरीत पडलेला बीबट सुमारे सतरा ते अठरा महिन्यांचा असून मादी जातीचे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्याची तपासणी केली, मात्र त्याला दुखापत नसल्याचे समोर आले. त्यामुळे लवकरच या बिबटला वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...