आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित:जादा दराने खत विक्री, प्रगती कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खताची चढ्या दराने सर्रास विक्री करून बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रगती कृषि सेवा केंद्राची तक्रार शेतकरी गौरव बोंडे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. कारवाई न झाल्यास आत्महत्येचा इशाराही दिला होता. या तक्रारीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी चौकशीअंती या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला. प्रगती कृषि सेवा केंद्रातून मासोद येथील शेतकरी गौरव बोंडे यांनी डीएपी खताच्या दहा बॅग खरेदी केल्या. एका बॅगची किंमत १३५० रुपये असताना कृषी सेवा केंद्राच्या संचालकाने मनमानी करीत १४०० रुपये प्रति बॅग अशी किंमत वसूल केली. गौरव बांडे यांनी याविषयी विचारणा केली असता अपमानास्पद वागणूक दिली. शिवाय बिल देण्यास स्पष्ट नकार दिला होता. सदर शेतकऱ्याने हा संपूर्ण घटनाक्रम मोबाइलमध्ये चित्र बद्ध केला होता.

बातम्या आणखी आहेत...