आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 ते 60 रुपये किलो:गाजराच्या हलव्याचा अजूनही सर्वसामान्यांपासून दुरावा!

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारंग, लाल, गुलाबी रंगातील गाजर म्हटले की, कोशिंबिर, गाजराचा आरोग्यदायी हलवा चटकन खवय्यांच्या डोळ्यांपुढे येतो. परंतु, यंदा मोठया प्रमाणात गाजराची आवक शहरातील बाजारात होत नसल्याने त्याचे दर ४० ते ६० रुपये किलो आहेत. त्यामुळेच अजूनही गाजराचा हलवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. गाजराचे दर गेल्या वर्षीप्रमाणे केव्हा २० रु. किलोपर्यंत खाली घसरतात याचीच सर्वसामान्य वाट बघत आहेत.

गाजराचा हलवा बनवला तरी त्यातील अ जीवनसत्त्व कायम राहते, अशी माहिती आहार तज्ज्ञांनी दिली आहे. दुधात गाजराचा किस टाकून शिजवला जातो. त्यात साखर व सुका मेवा घालून हलवा तयार केला जातो. हा हलवा हिवाळ्यात आरोग्यदायी असल्यामुळे तसेच चवीलाही मधुर वाटत असल्याने कोणालाही तो खाण्यास आवडतो. तसेच ते आरोग्यदायी आहे. त्यामुळे सलाद म्हणूनही त्याचा नियमितपणे आहारात वापर केला जातो. गाजर हे पोट, त्वचेसोबतच हृदय व रक्तवाहिनांचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे कच्च्या किंवा अर्धवट शिजविलेल्या गाजराचा रसही तेवढाच आरोग्यदायी आहे.

‘प्रो व्हिटॅमिन - ए’चा साठा गाजराचा आकर्षक नारंगी, लारसर रंग म्हणजे नैसर्गिक रंग द्रव्यांचा खजिना आहे. त्याला प्रो- व्हिटॅमिन असे म्हणतात. त्याचे रुपांतर अ जीवनसत्त्व होते. यासोबतच गाजरात क जीवनसत्व ही असते. हे दोन्हीही जीवनसत्त्व अॅन्टी आॅक्सिडन्ट असल्याने शरीरासाठी फारच लाभदायक आहेत. सोबतच गाजरात पाॅलीमर फायबर्स व पोटॅशियम असतं. त्यामुळे हृदयासोबतच रक्तवाहिन्या, डोळे आणि त्वचेसाठी ते उत्तम आहे. गाजराचा हलवा करून खाल्ल्या सही व्हिटॅमिन ए मिळते. परंतु, जर त्याचा रस घेतला तर तो आरोग्यासाठी उत्तम असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आहार तज्ज्ञांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...