आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाकडून अचलपूर नगर पालिकेला अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मोठी रक्कम प्राप्त झाली. परंतु अचलपूर पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वहित साधण्यासाठी निविदा प्रक्रियेचे नियम वेशीला टांगत या निधीतून इतरत्र कामे प्रस्तावित केली. ही नियमबाह्य कामे तत्काळ थांबवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन दिरिपाइंचे किशोर मोहोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सन २००७ ते २०२२पर्यंत अचलपूर नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात दलित वस्ती सुधार योजनेतील शासकीय निधीचा दुरुपयोग करण्यात आला. पालिकेला प्राप्त झालेला निधी नियमाप्रमाणे अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये खर्च करणे अभिप्रेत असताना हा निधी मोठया प्रमाणात इतरत्र वळवण्यात आला. या सर्व प्रकरणांची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना विलास थोरात, हेमंत ढोरे, शंकरराव प्रधान, नरेंद्र मेश्राम, भारत वानखडे, सतीश हरणे, सुनील सरदार आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.