आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यापैकीच देऊरवाडा-शिरजगाव कसबा मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आंदोलन भाजपद्वारे करण्यात येणार आहेत, परंतु तत्पूर्वीच ते खड्डे प्रशासनाने रातोरात बुजवले. मात्र माधान-काजळी मार्गावरील खड्डे तसेच होते.
त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माधान-काजळी मार्गावरील खड्डे बुजवून आंदोलन केले. या वेळी भाजपचे प्रवीण तायडे, मुरली माकोडे, अतुल बनसोड, प्रणित खवले, किरण सीनकर, सुरेश वानखडे, बाळू पोटे, नितीन टिंगणे, जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, गजानन राऊत आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.