आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:ग्रामपंचायत मतदानाची अंतिम टक्केवारी पोहोचली 77.71 वर; आज मतमोजणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींसाठी पार पडलेले मतदान शेवटच्या क्षणी ७७.७१ टक्क्यांवर पोहैोचले. शेवटच्या दोन तासांत १५.०१ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे दुपारी साडे तीन वाजेची ६२.४४ ही टक्केवारी वाढून ७७.७१ टक्क्यांवर स्थिरावली. हे.मंगळवारी या मतांची मोजणी केली जाईल. जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीसह सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी १० च्या ठोक्याला सर्व ठिकाणी मतमोजणी सुरु केली जाईल. मतमोजणीवर नियंत्रणासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या नेतृत्वात स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार केला असून, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावतीत भातकुली व अमरावती या दोन तालुक्यांची मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी दाेनपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...