आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएससी क्लस्टर टेबल टेनिस स्पर्धेचा समाराेप:खेळ शिकवतात जीवनातील संकटांचा सामना करायला; हबलानी यांचे प्रतिपादन

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्यवरांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी. या प्रसंगी मान्यवरांसह उपस्थित पुरस्कार प्राप्त खेळाडू - Divya Marathi
मान्यवरांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी. या प्रसंगी मान्यवरांसह उपस्थित पुरस्कार प्राप्त खेळाडू

खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळामध्ये विजय व पराजय या दोन्ही बाजू असणारच. त्यातून मनुष्य जीवन जगताना येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला किंवा सामना करायला शिकतो, असे प्रतिपादन एडिफाय स्कूलचे संस्थाध्यक्ष पुरणलाल हबलानी यांनी केले.

एडिफाय स्कूलमध्ये तीन दिवसीय सीबीएससी क्लस्टर टेबल टेनिस स्पर्धांचा समारोप करण्यात आला. त्याच्या बक्षिण वितरण समारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी विजेत्या खेळाडूंना पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, विलास मराठे, संस्थाध्यक्ष पुरणलाल हबलानी, संस्थेच्या संचालक व सहसचिव निरु कपाई, सचिव व व्यवस्थापक रोहन कपाई, कोषाध्यक्ष शिवाराम कृष्णा, प्राचार्य डॉ. चैताली कुमार, संस्थेचे मुख्य सदस्य रवि इंगळे उपस्थित होते. या वेळी स्पर्धेमध्ये परायज पत्करावा लागलेल्या खेळाडूंनी हार न मानता जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन निरू कपाई यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. स्पर्धेसाठी एच. के. खान, सहजाद, संजय सस्तकार, वैष्णवी इाकरे, आयुष बरबोले, सार्थक तभाने, वैभव वानखडे, कनिष्क घोडेस्वार, उदित अडसूळ, क्रीडा संयोजक आनंद इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

मुलांच्या स्पर्धेतील विजेते गट

१४ वर्षे वयोगटात मुलांमधून पीआयसीटी मॉडेल स्कूल, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, मिलेनियम नॅशनल स्कूल, तर १७ वर्षे वयोगटात भवन विद्यामंदिर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, होली राईट स्कूल व १९ वर्षे वयोगटात जी. जी. इंटरनॅशनल स्कूल, भवन विद्यामंदिर यांनी अनुकमे प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकावला.

मुलींच्या स्पर्धेतील विजेते गट

मुलींच्या गटात वैयक्तिक गटातून १४ वर्षे वयोगटात आद्या बाहेती, अक्षरा सातपुते, आरुणी गोतमारे, तर १९ वर्षे वयोगटात नाशिक केंब्रिज स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, िमलेनियम नॅशनल स्कूल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक, तर इंडो पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी चतुर्थ स्थान पटकावले.

यांनीही मारली स्पर्धेत बाजी

टेबल टेनिस स्पर्धेत पार्थ मुंधडा, ऋषिकेष पाटील, प्रिन्स चौधरी, राजवर्धन सिंगारे, श्रेयश भट्ट, चौलक्ष सेनक, आदित्य बुंडे, कोणार्क कौशिक, अर्जुन आशिरगडे यांनीही स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत बक्षिसे खिशात घातली.

बातम्या आणखी आहेत...