आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताटातूट:अखेर त्या दोन बछड्यांना भेटली त्यांची माता; ताटातूट झालेल्या बिबट्याच्या पिल्लांना वन विभागाच्या पथकाने जंगलात सोडले सुरक्षित

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई आणि तिच बाळ हे जगातील सर्वात मोठ मायेच नातं आहे. मग ते मानव, पशू किंवा प्राणी सर्वांसाठीच लागू आहे. शहरालगत महादेव खोरी जंगल परिसरात गुरूवारी (दि. १) बिबटचे सात ते आठ महिन्यांचे दोन बछडे दिसले होते. त्यांना वनविभागाचे आपल्या ताब्यात घेतले होते. या बछड्यांची मादी बिबटपासून ताटातूट झाली होती. त्यामुळे या पिल्लांना त्यांच्या मातेजवळ सुखरूप पोहोचवण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न शनिवारी (दि. ३) पहाटे चार वाजता यशस्वी झाले.

जंगल परिसरात सुरक्षितरीत्या बछडे ठेवण्यात आले होते. काही वेळानंतर मादी बिबट आली व तिच्या दोन्ही पिल्लांना मायेने घेऊन तत्काळ निघून गेली. १ सप्टेंबरला दुपारी दोन्ही बछड्यांची पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली होती. दोन्ही बछडे ठणठणीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

मादी बिबटासोबत गेली पिल्ले
मादी बिबटचे जंगलातील अस्तित्वाबाबत माहिती घेतली. त्यानंतर शुक्रवारी रात्री देान्ही बछड्यांना जंगलात नेले. पहाटे चार वाजेच्या सुमारास मादी बिबट आली व दोन्ही बछड्यांना घेऊन गेली आहे.
अमोल गावनेर, रेस्क्यू पथक.

बातम्या आणखी आहेत...