आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती:थंडीपासून बचावासाठी लावलेल्या हीटरमुळे आग; अमरावतीच्या जवानाचा होरपळून मृत्यू

परतवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवान कैलास कालू दहीकर यांची कुलू मनाली येथे बिहार रेजिमेंटच्या 15 व्या तुकडीत नियुक्ती होती

हिमाचल प्रदेशातील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या केरोसीन हीटरमुळे तंबूला आग लागली. या भीषण आगीत अमरावती जिल्ह्यातील जवान कैलास कालू दहीकर यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. कैलास हे अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी असून त्यांची कुलू मनाली येथे बिहार रेजिमेंटच्या १५ व्या तुकडीत नियुक्ती होती. मागील पाच वर्षांपासून कैलास दहीकर हे लष्करात कार्यरत होते. हिमाचल प्रदेशाच्या कुलू मनाली येथे उणे १५ अंश तापमान असल्याने सैनिकांच्या बचावासाठी असणाऱ्या तंबूत केरोसीन हीटर (बोखारी) लावण्यात येते. या बोखारीमुळे अचानक तंबूला लागलेल्या आगीत कैलास यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना दीड वर्षाची चैताली नावाची मुलगी आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व लहान भाऊ असा परिवार आहे

बातम्या आणखी आहेत...