आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचवेळी 32 धनुर्धर सोडू:अमरावती येथील देशातील सर्वोत्तम‎ आर्चरी रेंजवर पहिली धनुर्विद्या स्पर्धा‎

वैभव चिंचाळकर | अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढे ‎विभागीय क्रीडा संकुलाचाच एक भाग‎ असलेले देशातील सर्वोत्तम आर्चरी‎ (धनुर्विद्या) रेंज स्पर्धा आयोजनासाठी सज्ज ‎झाले असून येथे महाराष्ट्र मिनी ‎ऑलिम्पिकअंतर्गत धनुर्विद्या स्पर्धेचे‎ आयोजन करण्यात आले आहे. ही येथे ‎आयोजित होणारी पहिलीच स्पर्धा असून ५ ते‎ ८ जानेवारी या कालावधीत ती होणार आहे.‎ ऑलिम्पिक नियमांनुसार या रेंजची निर्मिती ‎करण्यात आली असून ७० मी. अंतरावर‎ लक्ष्य (टार्गेट) ठेवण्यात आले आहे.‎ त्याचप्रमाणे एकाचवेळी ३२ धनुर्धर ३२‎ लक्ष्यांवर तीर सोडू शकतील अशी येथे सोय ‎आहे.

या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी ‎प्रसाधनगृह, विश्रांती घेता येईल, अशी सोय ‎करण्यात आली आहे.‎ मिनी आॅलिम्पिकसाठी रिकर्व्ह, कम्पाऊंड व‎ इंडियन या तिन्ही प्रकारात राज्यभरातून २९२‎ सिनिअर पुरुष व महिला खेळाडू, पंच, प्रशिक्षक ‎आणि व्यवस्थापक येथे येणार आहेत. मागील ‎ ‎ राज्यस्तरीय स्पर्धेत जे सर्वोत्तम आठ संघ‎ निवडण्यात आले तेच या स्पर्धेत सहभागी‎ होतील. त्यात अमरावती जिल्ह्याचाही समावेश‎ आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या‎ नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.‎ या स्पर्धेसाठी देशातील सर्वोत्तम आर्चरी रेंजवर‎ जय्यत तयारी सुरू असून जमीन समतोल‎ करण्यापासून ते पंडाल टाकण्यापर्यंत येथे सोय‎ केली जात आहे.‎ ‎ ‎ सोनीपत येथेही अशीच रेंज तयार होत‎ आहे : साेनीपत येथेही अशीच रेंज तयार होत‎ आहे. परंतु, तिचे काम हे निर्माणाधिन आहे.‎ अमरावतीत मात्र रेंज तयार झाली असून येथे‎ आता प्रत्यक्ष सराव सुरू झाला आहे.‎ त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत स्पर्धाही‎ सुरू होईल. त्यामुळे स्थानिक धनुर्धरांना‎ स्पर्धा, सरावासाठी हक्काचे रेंज मिळाले‎ आहे.‎

देशातील सर्वोत्तम आर्चर रेंज‎ देशातील हे सर्वोत्तम आर्चरी रेंज आहे. येथे‎ भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आॅलिम्पिक,‎ वर्ल्ड कपसाठी सराव करता येईल. तसेच‎ एकाचवेळी ३२ धनुर्धर ३२ लक्ष्यांवर तीर सोडू‎ शकतील, अशी सोय आहे. ऑलिम्पिक‎ नियमांनुसार याची निर्मिती करण्यात आली‎ आहे.‎ -प्रमोद चांदूरकर, महासचिव, भारतीय धनुर्विद्या‎ संघटना.‎

बातम्या आणखी आहेत...