आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाउस:मान्सूनच्या पहिल्या सरी; जिल्ह्यात 24 तासांत 24.3 मिलिमीटर पाऊस

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून दाखल झाल्यानंतर शनिवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता पहिला पाऊस जिल्ह्यात कोसळला. त्यानंतर रविवारी (दि. १९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास सार्वत्रिक जोरदार पाऊस जिल्ह्यात झाला. १८ ते १९ जून (सकाळी साडेदहापर्यंत) या २४ तासांत जिल्ह्यात २४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चांदूर बाजार व तिवसा तालुक्यातील प्रत्येकी दोन महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १०७.५ मिमी पाऊस ब्राम्हणवाडा थडी मंडळात झाला आहे.

शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले होते. शनिवारी सकाळी शहरासह इतर भागात पाऊस आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरच जिल्ह्यात हलका फुलका तर कुठे दमदार पाऊस पडला. मात्र, रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मात्र जिल्हाभर सार्वत्रिक पाऊस पडला. यामध्ये अमरावती, चिखलदरा, धारणी, तिवसा, चांदूर बाजार आणि मोर्शी या सहा तालुक्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. याचवेळी मात्र धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, भातकुली तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात २४ तासात सर्वात कमी म्हणजेच केवळ २.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...