आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेर्टाचा निर्णय:अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पाच वर्षांची शिक्षा ; चार वर्षांपूर्वी घडले होते प्रकरण

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिचित असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील न्यायालयाने पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निर्णय न्यायालयाने शनिवारी (दि. ५) दिला आहे.विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शे. सत्तार शे. जब्बार (४५, रा. शहापूर पुनर्वसन, वरुड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २६ मे २०१८ रोजी शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई व वडील मजुरीकरिता घराबाहेर गेले होते. यावेळी घरात पीडिता व अन्य तिघी मुली होत्या. दुपारी पीडितेच्या घरी तिचे वडील व आरोपी शे. सत्तार शे. जब्बार आला होता. पीडितेचे वडील कामावर निघून गेल्यानंतर आरोपी तिथेच थांबला होता. त्याने पीडितेला दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेची आई घरी आल्यावर तिने आईला घडलेला घटनाक्रम सांगितला.

सायंकाळी पीडितेचे वडील घरी मद्यप्राशन करून आले होते. त्यामुळे तिच्या आईने ही बाब सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या वडीलांना ही बाब कळल्यावर ते आरोपीच्या घरी पोहोचले व त्यांनी त्याला जाब विचारला. परंतु त्याने शिवीगाळ केली. यानंतर पीडितेच्या आईने शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शे. सत्तार शे. जब्बार याच्याविरुद्ध बलात्कार तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...