आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृद्धापकाळाने आईच्या निधनानंतर धार्मिक विधीला बगल देत, तिची रक्षा शेतातील आंब्याच्या झाडांना विसर्जन करून हीच झाडे आम्हाला आईच्या मायेची सावली व गोड-मधूर फळे चाखायला देतील या भावनेतून शेतकरी मायकर कुटुंबाने आईच्या अस्थी आंब्याच्या रोपट्याखाली शनिवारी विसर्जित केल्या. शिवाय ११ मुलींच्या नावे प्रत्येकी १० हजार याप्रमाणे १ लाख १० हजारांची मुदतठेवही केली . पिंपळगाव (ना.) येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुभाष मायकर, माउली मायकर व कुंडलिक मायकर यांच्या आई किसनाबाई रोहिदास मायकर यांचे मंगळवारी (७ मार्च) निधन झाले. जागतिक महिलादिनी (८ मार्च) सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू धर्मात बहुतांश समाजामध्ये चौदा दिवसांचा दुखवटा पाळून चौदावा झाल्यानंतर कुटुंबीय आपापल्या कामाला लागतात. मात्र एवढे दिवस दुखवटा न पाळता पाच दिवसांचा दुखवटा पाळणार असल्याचे सुभाष मायकर यांनी जाहीर केले. परंपरागत राख सावडल्यानंतर मायकर परिवाराने राख गंगेत न टाकता त्यांच्या स्मरणार्थ वृक्षांना विसर्जित करून व तेराव्यासाठी लागणारा खर्च अकरा मुलींच्या नावे प्रति दहा हजार रुपयांप्रमाणे बँकेत मुदतठेव केली. त्यामुळे त्या मुलींना अठरा वर्षांनंतर प्रत्येकी एक लाख रुपये मिळतील असे सुभाष मायकर यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.