आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोककलावंतांच्या पारंपारिक लोक कलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम राज्यभर राबवण्यात आला. या अभिनव कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्थानिक भाषेतून शाहीरी, लोकगीत, पोवाडा, भारूड अशा पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषतः वऱ्हाडी आणि कोरकू भाषेतून गावकऱ्यापर्यंत राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहोचवण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.
गत दोन वर्षात शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबवण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.
समर्पण बहुद्देशीय संस्था, माई मानव बहुद्देशीय संस्था तसेच गंधर्व बहुद्देशीय संस्था या लोककला पथकामार्फत जिल्ह्यात ६३ च्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात कला पथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले. धारणी तसेच चिखलदरा या भागात कोरकू भाषेतूनही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले, हे विशेष.
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककला पथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबवण्यात आलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या.ग्रामस्थांनी घेतला लोककलेचा आस्वाद ग्रामीण भागात लोककलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कोरोना निर्बंधामुळे लोककलेचे आयोजन दोन वर्षात झाले नव्हते. जिल्हा माहिती कार्यालयामुळे ग्रामस्थांनी लोककलेचा आनंद घेतला. या पारंपारिक लोककलेच्या कार्यक्रमाचे प्रथमच जिओ टँगिंगही करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.