आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गतिमान प्रशासन ही युक्ती प्रत्यक्षात यावी आणि काळानुसार पावले पडावी म्हणून सर्व विभागात डिजिटल माध्यमांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकांना महिला व बालकल्याण विभागाकडून दोन वर्षांपूर्वी मोबाइल दिले होते. मात्र, यातील पोषण ट्रॅकरवर काम करणे डोकेदुखीचे ठरत असल्याने अंगणवाडी सेविकांनी अखेर हे मोबाइल प्रशासनाकडे परत केले. त्यामुळे नवीन मोबाइल उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सर्व अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. अंगणवाडीचे काम करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मोबाइल देण्यात आले होते.
जिल्ह्यातील २ हजार ४९६ अंगणवाड्या व १५० मिनी अंगणवाडी आहेत. येथील कार्यरत अंगणवाडी सेविकांना मोबाइलची आवश्यकता असते. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पोषण ट्रॅकर या मोबाइल अॅपवर भरावी लागते. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइलची आवश्यकता आहे. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणही दिले. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मोबाइलमध्ये कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर कास याद्वारे माहिती भरली जात होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.