आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकीत:कोरोना निर्बंधानंतर यंदा वर्तवले जाईल भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत; या भाकिताकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे

जळगाव जामोद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीही कोरोनाचे निर्बंध लागू असल्यामुळे भेंडवळच्या मांडणीचे भाकीत लोकांसमोर मांडले होते. गर्दीवर मर्यादा असली तरी मागील वर्षी गर्दी झाली होती. यावर्षी मात्र मर्यादा उठवण्यात आल्याने निर्बंधमुक्त भेंडवळच्या मांडणीचे भाकीत वर्तवले जाणार आहे. गेल्या तीनशे वर्षांपासून चंद्रभान वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळ येथे घट मांडणी करतात. त्यानुसार आज ३ मे रोजी सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात आली. उद्या ४ मे रोजी त्याचा भाकीत वर्तवले जाणार आहे. राजकीय, सामाजिक व पिकांच्या बाबतीतील भाकीते वर्तवले जाणार आहे. या भाकिताकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

गतवर्षी पिकांची परिस्थिती सर्व साधारण सांगण्यात आली होती. राजा कायम राहणार आहे. मात्र देशात घुसखोरीचे प्रमाण वाढणार असून राजाभोवती अडचणी वाढणार आहे. आर्थिक मंदीचे राहणार असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येणार आहे. पर्जन्यमान ठीक असून पाणी टंचाई जाणवणार नाही. रोगराई अजुनही कायमच राहणार असल्याचे संकेत भेंडवळच्या मांडणीतून देण्यात आले आहेत. त्यातील भाकित बहुतांशी खरे ठरले आहे.

गतवर्षी १५ मे रोजी भाकीत वर्तवण्यात आले होते.चंदभान महाराजांचे वंशज पुंजाजी वाघ व त्यांचे सहकारी सारंगधर वाघ यांनी हे भाकीत मांडले होते. आज घट मांडणी झाली असून, पुंजाजी वाघ महाराज व घरातील इतर व्यक्ती ४ मे रोजी सकाळी ६ वाजता घटातील प्रत्येक धान्य, घट व घागरी वरील सांडोई, पापड यांचे निरीक्षण करणार आहेत.

त्यावरुन भाकीत सांगतात. घटाची मांडणी बस स्थानकाच्या बाजूच्या शेतात केली जाते. दीड बाय दोन फुटाचा खोल खड्डा खोदून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात आली. त्या खड्ड्यात चार मातीचे ढेकळे ठेवून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात आली. घागरीवर सांडोई, कुरडोई, पापड ठेवण्यात आले. खड्ड्यात जमिनीवर पान विडा ठेवण्यात आला. समान अंतरात धान्य व इतर साहित्य ठेवण्यात आले. हे सर्व करुन वाघ कुटूंब घरी निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...