आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा:गांजाच्या मुख्य पुरवठाराच्या शोधात ग्रामीण पोलिस पहिल्यांदाच ओडिशात

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिसांच्या ‘एलसीबी’ने शुक्रवारी (दि. २) उशिरा रात्री चांदूर रेल्वे जवळ तब्बल ४३५ किलो गांजा पकडला. हा गांजा ओडिशातून आला आहे. त्यामुळे ओडिशामधील मांजाच्या मुख्य पुरवठ्याला पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक ओडिशाच्या दिशेने रवाना झाले आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिस ओडिशात गेल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.

अमरावती शहर व जिल्ह्यात येणारा व विक्री करणाऱ्यांवर यापुर्वी पोलिसांनी कारवाई केली असता अटकेतील आरोपींनी गांजाचे मुळ आेडिशा, विशाखापट्टणम असल्याचे सांगितले आहे.

मात्र, पोलिसांचा तपास शक्यतोवर जिल्ह्याबाहेर जात असल्याचे आतापर्यंत समोर आले नाही. मात्र, यावेळी पोलिसांनी विक्रमी ४३५ किलो गांजा जप्त केला आहे. सोबतच गांजा वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. शहर व जिल्ह्यात हा गांजा कोणी बोलावला आहे, त्यांचा पोलिस शोध घेतच आहे. मात्र, प्रत्येकवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्यांचे पाळेमुळे खोदून काढा, असे आदेशच पोलिस अधीक्षकांनी दिल्यामुळे एलसीबी व चांदूर रेल्वेचे एक स्वतंत्र पथक रविवारी (दि. ४) ओडिशाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांना ओडिशात जाऊनॉ मुख्य पुरवठादाराला पकडण्यात यश आले तर ती पहिलीच वेळ ठरणार आहे की, एखाद्या गांजा पुरवठादार ग्रामीण पोलिसांच्या हातात आला आहे.

दुसरीकडे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेल्या ऋषभ मोहन पोहोकार (२५, रा.रिद्धपूर ता. मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, ता.चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (१९, आझाद नगर, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतीफ (१९, रा. रतनगंज, खुर्शीदपुरा, अमरावती) यांच्या चौकशीतून हा गांजा शहर व जिल्ह्यात कोणी बोलावला, याबाबत माहिती पोलिस घेत आहेत. त्यांची नावे समोर येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू केला आहे. लवकरच ग्रामीण पोलिस गांजा तस्करीच्या मुळापर्यंत जाईल, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कारवाईवरुन गांजाचा पुरवठा ओडिशामधून होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ओरीसामधील मुख्य पुरवठादाराच्या शोधात एक पथक ओडिशाला रवाना केले आहे, असे ‘एलसीबी’चे पीआय तपन कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...