आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईमनगरी:गांजाच्या मुख्य पुरवठाराच्या शोधात ग्रामीण पोलिस पहिल्यांदाच ओरिसात; आतापर्यंत गांजाचा पुरवठा त्याच भागातून

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामिण पोलिसांच्या एलसीबीने शुक्रवारी (दि. 2) उशिरा रात्री चांदूर रेल्वेजवळ तब्बल 435 किलो गांजा पकडला. हा गांजा ओरीसातून आला आहे. त्यामुळे ओरीसामधील गांजाच्या मुख्य पुरवठाराला पकडण्यासाठी ग्रामिण पोलिसांचे पथक ओरीसाच्या दिशेने रवाना झाले आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिस ओरीसात गेल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती शहर व जिल्ह्यात येणारा व विक्री करणाऱ्यांवर यापुर्वी पोलिसांनी कारवाई केली असता अटकेतील आरोपींनी गांजाचे मुळ ओरीसा, विशाखापट्टनम असल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांचा तपास शक्यतोवर जिल्ह्याबाहेर जात असल्याचे आतापर्यंत समोर आले नाही. मात्र यावेळी पोलिसांनी विक्रमी 435 किलो गांजा जप्त केला आहे. सोबतच गांजा वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. शहर व जिल्ह्यात हा गांजा कोणी बोलवला आहे, त्यांचा पोलिस शोध घेतच आहे. मात्र प्रत्येकवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्यांचे पायेमुळे खोदून काढा, असे आदेशच पोलिस अधिक्षकांनी दिल्यामुळे एलसीबी व चांदूर रेल्वेचे एक स्वतंत्र पथक रविवारी (दि. 4) ओरीसाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांना ओरीसात जाऊन मुख्य पुरवठादाराला पकडण्यात यश आले तर ती पहिलीच वेळ ठरणार आहे की, एखाद्या गांजा पुरवठादार ग्रामिण पोलिसांच्या हातात आला आहे.

हे आहेत आरोपी

दुसरीकडे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेल्या ऋषभ मोहन पोहोकार (25, रा.रिध्दपुर ता. मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (20, रा. शिरजगाव कसबा, ता.चांदुर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (19 आझाद नगऱ, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतीफ (19, रा. रतनगंज, खुर्शीदपुरा, अमरावती) यांच्या चौकशीतून हा गांजा शहर व जिल्ह्यात कोणी बोलवला, याबाबत माहीती पोलिस घेत आहेत. त्यांची नावे समोर येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू केला आहे. लवकरच ग्रामिण पोलिस गांजा तस्करीच्या मुळापर्यंत जाईल, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

पथक ओरीसासाठी रवाना

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कारवाईवरुन गांजाचा पुरवठा ओरीसामधून होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ओरीसामधील मुख्य पुरवठादाराच्या शोधात एक पथक ओरीसाला रवाना केले आहे.

- पीआय तपन कोल्हे, एलसीबी.

बातम्या आणखी आहेत...