आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिने अत्याचार:तरुणीला ब्लॅकमेल‎ करुन सक्तीने लग्न‎, तरुणीच्या तक्रारीवरुन शिरखेड पोलिसांत गुन्हा‎

प्रतिनिधी | अमरावती‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुझ्या वडिलांच्या भेटीसाठी ‎ दवाखान्यात घेऊन जातो, असे‎ सांगून एका तरुणीला ४५ वर्षीय‎ व्यक्तीने अमरावतीत आणले.‎ त्यानंतर एका लॉजवर तरुणीचे ‎ अश्लील छायाचित्र काढले. याच ‎ छायाचित्राच्या आधारे तिला‎ ब्लॅकमेल करुन मुंबईत नेले. ‎ त्याठिकाणी जबरीने लग्न केले.‎ त्यानंतर त्याने घरी आणून सुमारे‎ सहा महिने डांबून ठेवत तिचे‎ शारीरिक शोषण केले. अशी तक्रार ‎ पीडीत तरुणीने पोलिसात दिली. या‎ तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी‎ (दि. १२) ४५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला आहे.‎

मो. इरफान शेख गफार (४५, रा.‎ शिरखेड पोलिस ठाणे हद्द) असे‎ गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे‎ नाव आहे. पीडीत तरुणीच्या‎ तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर २०२२‎ रोजी मो. इरफानने तुझ्या वडीलांच्या‎ भेटीसाठी अमरावतीत घेऊन जातो,‎ असे सांगून तरुणीच्या गावावरुन‎ अमरावतीत आणले. त्यावेळी‎ शहरातील एका लॉजमध्ये नेऊन‎ तिचे अश्लील छायाचित्र काढले.‎ त्यानंतर हेच अश्लील छायाचित्र‎ व्हायरल करेल, अशी धमकी देवून‎ त्या आधारे ब्लॅकमेल करुन तिला‎ मुंबईतील बांद्रा भागात नेले. त्या‎ ठिकाणी त्याने जबरीने या‎ तरुणीसोबत लग्न केले. मुंबईतून‎ त्याने तरुणीला स्वत:च्या गावात‎ आणले. गावात आणल्यानंतर त्याने‎ पीडितेला डांबून ठेवत धमकी दिली.‎ या काळात त्याने तरुणीवर शारीरिक‎ अत्याचार केला. या प्रकारामुळे‎ तरुणीने १२ मे रोजी शिरखेड पोलिस‎ ठाणे गाठून मो. इरफान शेख गफार‎ याच्याविरुद्ध तक्रार दिली.‎ तक्रारीवरून पोलिसांनी‎ त्याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी‎ देणे, बळजबरीने लग्न करणे तसेच‎ माहुती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

सहा महिने डांबून‎ शारीरिक अत्याचार‎

विशेष म्हणजे मो. इरफानचे पूर्वीच‎ एक लग्न झाले आहे, ही बाबसुद्धा‎ पीडीत तरुणीपासून त्याने लपवून‎ ठेवली. त्यानंतर मुंबईतून त्याने‎ तरुणीला स्वत:च्या गावात आणले.‎ गावात आणल्यानंतर त्याने पीडितेला‎ डांबून ठेवत धमकी दिली. या सहा‎ महिन्याच्या काळात त्याने तरुणीवर‎ शारीरिक अत्याचार केला.‎‎