आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांस फॉरेन्सिक:वनविभागाने वझ्झरखेड गावात जप्त केले मांस; हरिणाचे की काळविटाचे?

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपूर्वी वडाळी वनपरिक्षेत्राचे आरएफओ वर्षा हरणे व त्यांच्या पथकाने पूर्णा नगर परिसरात धाड टाकून हरिणाचे मास जप्त करुन चौघांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. ६) आरएफओ पवार यांच्याच पथकाने वलगाव परिसरातील वझ्झरखेड येथे धाड टाकून एका ठिकाणाहून मांसाची शिजलेली भाजी जप्त केली. मात्र, हे मांस हरिणाचे की काळविटाचे ते मात्र स्पष्ट झाले नाहीत. त्यामुळे वन विभाग जप्त मांसाची फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करुन घेणार आहे. वनविभागाने सोमवारी टाकलेल्या धाडीत सुमारे एक किलो मांसाची तयार झालेली भाजी तसेच त्याच परिसरातून मोरा पंख, काळविटाच्या शिंगाप्रमाणे दिसणारे एक शिंग जप्त केले आहेत. मात्र शिजलेली भाजी नेमकी हरणाच्या कि काळविटाच्या मांसाची आहे, हे प्रथमदर्शनी ओळखणे शक्य नाही. तसेच याचवेळी आरोपी पसार झालेला आहे. त्यामुळे मांस नेमके कशाचे या निष्कर्षाप्रत वन विभाग सोमवारी रात्रीपर्यंत पोहोचू शकले नव्हते. कारण सदर मांस काळविटाचे असल्यास गुन्ह्याचे स्वरुप अधिक गंभीर होते. कारण काळवीट हे शेड्युल्- १ मधील आहे, अशी माहिती वन विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...