आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष मिलिंद तायडे यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा परिषद विश्रामगृह येथे पक्षाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा झाली. यावेळी विजय गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर अशोक कुऱ्हाडे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मिलिंद तायडे, मिलिंद वानखडे, सचिन गवळी, अवधूत शेंडे, धनंजय पळसपगार, गजानन खडसे, सनी रंगारी, सुरेश कांबळे, उमेश उमरे, रवी वासनिक, विजय आठवले, धर्मेंद्र गडलिंग, प्रेम जवंजाळ, प्रणय ढोके, केशव वानखडे, संजय भालेराव, सिद्धार्थ तायडे, महेश नेरिया, नितीन खोबरागडे, भारत कुबडे, हैदर शहा, निरंजन नागदिवे, किशोर पाटील, राजेंद्र सरदार, अनिल बादशे, प्रवीण शेंडे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी विजय गायकवाड तर सचिवपदी अशोक कुऱ्हाडे यांची नियुक्ती केली. सोबतच चांदूर बाजार शहराध्यक्षपदी सुनील सनी तर तालुकाध्यक्षपदी धनंजय पळसपगार, तसेच अनिल बादशे यांची अमरावती तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, या नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.