आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप शिंगोरेंचे निधन:सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व हरपले

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील एक आघाडीचे व्यक्तिमत्व डॉ. प्रदीप शिंगोरे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मुंबईहून उशीरा रात्री अमरावतीत आणले जाणार असून सोमवारी 5 सप्टेंबर रोजी अंतिम संस्कार केले जातील. मांगिलाल प्लॉट स्थित निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.

भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या दिवंगत डॉ. प्रदीप शिंगोरे यांनी येथील अंबादेवी ट्रस्ट हॉस्पीटलमध्ये प्रदीर्घ काळ सेवा दिली. ते या हॉस्पीटलचे 15 वर्षे अध्यक्ष होते. अंबादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी पाच वर्षे सांभाळली आहे. इंडियन मेडिकल असोसीएशनच्या जिल्हा कार्यकारिणीतही ते सदैव सक्रीय होते.

याशिवाय अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मीनल, दोन मुले डॉ. दुश्यंत व अभियंता आदित्य, मुलगी डॉ. प्रियंका, जावाई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

समाजमन हळहळले

सामाजिक, राजकीय, धार्मिक व वैद्यकीय अशा चौफेर क्षेत्रात वावरणाऱ्या डॉ. प्रदीप शिंगोरे यांच्या निधनाबद्दल अमरावतीमधील सर्वच क्षेत्रातूनहळहळ‌ व्यक्त केली जात आहे. मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी जेव्हा त्यांच्या निधनाचे वृत्त अमरावतीत धडकले, त्यावेळी राजकीय व वैद्यक क्षेत्रातून एक-दुसऱ्यांना विचारणा सुरु झाली. त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य अमरावतीत नाही. रात्री त्यांचे पार्थिव अमरावतीत पोहोचल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेण्याची शक्यता आहे

रिफॉर्म्स क्लबचे अध्यक्ष

डॉ. प्रदीप शिंगोरे हे येथील रिफॉर्म्स क्लबचेही काही काळ अध्यक्ष होते. शहरातील उच्चपदस्थ अधिकारी व गावांतील नामवंत व्यक्तींसाठीच्या या संस्थेलाही डॉ. शिंगोरे यांनी चांगली सेवा दिली. कॅम्प स्थित विद्याभारती महाविद्यालयासमोरील या वास्तूचे नवीनीकरण त्यांच्याच काळात केले गेले.

बातम्या आणखी आहेत...