आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:माजी जि. प. सदस्य वासंती मंगरोळेयांच्या फार्म हाऊसवर आयकरची धाड

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पथ्रोट येथे ‘आयकर’च्या पथकाकडून झाडाझडतीपथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीतील वाल्मीकपूर शिवारात माजी जिल्हा परिषद सदस्या वासंती मंगरोळे यांच्या राणावत या आलिशान फार्म हाऊसवर आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ७) धाड टाकली. सोबतच अंजनगाव सुर्जी मार्गावरील जुन्या निवासस्थानावर तसेच तेलंगखडीतील काही नातेवाइकांची देखील यावेळी विचारपूस करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या या आकस्मिक धाडसत्रामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंतही आयकर पथकाची कारवाई सुरूच होती.

महाराष्ट्रासह देशातील चार राज्यात विविध ठिकाणी आज आयकर विभागाने धाडसत्र राबवले आहे. यातच अचलपूर तालुक्यातील पथ्रोटच्या रहिवासी व माजी जि.प. सदस्या वासंती मंगरोळे यांच्या फार्म हाऊसवर सकाळी आयकरचे पथक पोहोचले होते. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या मध्यान्ह भोजन पुरवठा घोटाळा प्रकरणाचे या धाडीसोबत तार जुळले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या कारवाईबाबत आयकर विभागाच्या पथकाने प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईमध्ये आयकर विभागाच्या पथकाला नेमके काय हातात आले, हे समोर आले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...