आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Former Guardian Minister Jagdish Gupta Arrested Along With BJP MLA Praveen Pote, Sharad Pawar Will Not Be Allowed To Set Foot In Amravati Anil Bonde

अमरावती हिंसाचार प्रकरण:भाजपचे आमदार प्रवीण पोटेंसह माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांना अटक, शरद पवार यांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही- अनिल बोंडे

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीतील दंगलप्रकरणी मंगळवारी शहर कोतवाली पोलिसांनी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता व माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांना अटक केली. भाजपचे आमदार तथा माजी पालकमंत्री पोटे व जगदीश गुप्ता यांच्यासह कृणाल सोनी, दीपक पारवानी, सत्यजित राठोड, संगम गुप्ता, उमेश मोहोडे, चेतन वाटोडकर, कर्ण धोटे, अनिल कोरडे यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुप्ता व पोटे यांना न्यायालयासमोर हजर केले. यासोबतच राजापेठ, नागपुरी गेट, गाडगेनगर पोलिस ठाण्यातही शुक्रवारी व शनिवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत.

त्यामुळे पोलिसांकडून त्या गुन्ह्यातील संशयितांचीही धरपकड सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना कोणत्याही परिस्थितीत अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

दंगलीबाबत वस्तुस्थिती माहिती नाही

या दंगलीत भाजपसह रझा अकादमी व युवा सेनेचाही हात असल्याचे बोलले जाते. पण मला वस्तुस्थिती माहिती नाही. समज-गैरसमज आणि अफवेतून चुकीच्या काही घटना घडल्या असतील तर चौकशीनंतर कारवाई होईल. काहींनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फायदा घेतल्याची शंका आहे. - शरद पवार, नागपूर येथे पत्रकारांशी बाेलताना.

बातम्या आणखी आहेत...