आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हॉकीचे माजी ऑलिम्पियन अशोक ध्यानचंद म्हणतात, विदर्भामध्ये खेळाडूवृत्ती जागवा!

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडाप्रेमी डॉ. उमेश राठी यांच्या निवासस्थानी रंगल्या गप्पा

लायन्स क्लबचे पदाधिकारी डॉ. उमेश राठी यांच्या निवासस्थानी हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तथा माजी ऑलिम्पियन अशोक ध्यानचंद यांनी अलिकडेच भेट दिली. शहरात सुरु असलेल्या अखिल भारतीय महिला हॉकी टूर्नामेंटच्या निमित्ताने ध्यानचंद अलिकडेच अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी डॉ. राठी यांच्या निवासस्थानीही भेट दिली.

या भेटीवेळी अमरावती शहर तसेच विदर्भात खेळाडूवृत्ती जागृत व्हावी आणि खेळाला चालना मिळावी याविषयी चर्चा करण्यात आली. डॉ. उमेश राठी हे कुऱ्हा येथील कला व विज्ञान महाविद्याच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक असून, ते फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन नवी दिल्लीचे (विदर्भ चाप्टर) सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडाविषयक अनेक समित्यांवरही ते कार्य करतात.

याप्रसंगी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, समाजसेवक डॉ. गोविंदभाऊ कासट, अग्रवाल, सलीमभाई मीरावाले, हॅलो कॉर्नरचे संचालक इरफान अथहर अली, भास्करगव वैद्य यांच्यासह बहुसंख्य शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.