आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:बाजार समितीतील चारहमालांना अटक, जामीन; दर्यापूर येथे दोन शेतकऱ्यांना मारहाणीचे प्रकरण

दर्यापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. ११) दुपारी हमाल व शेतकरी यांच्यामध्ये किरकोळ वाद निर्माण होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात दोन शेतकरी जखमी झाले होते. या घटनेची गंभीर जखमी झालेले शेतकरी ज्ञानेश्वर वडतकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान, शनिवारी (दि. १२) पहाटेच मारहाण करणाऱ्या चारही हमालांना पोलिसांनी अटक केली.

शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाजार समितीमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत मारहाण करणारे हमाल शेख समीर शेख कलीम, शेख कलीम शेख कदीर, अन्सार उर्फ मतीन्नोदीन इक्रामोद्दीन, मोहम्मद निसार चौघेही रा. बाभळी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. शनिवारी चौघांनाही सकाळीच स्थानिक पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ विनोद पाथरे, नवनाथ खेडकर करीत आहे.

बाजार समितीचा धान्य बाजार राहणार बंद
हमालांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणानंतर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बाजार समितीत मोजमाप आदी प्रक्रिया सुरू होती. दरम्यान बाजार समिती यार्डात जागा उपलब्ध नसल्याने व वातावरणातील बदलामुळे शेतकरी, व्यापरी, अडते व हमाल, मापरी यांची गैरसोय होऊ नये म्हणून शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत धान्य बाजार बंद राहणार असल्याची माहिती सचिव हिंमत मातकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...